मये मतदार संघ हा पूर्णपणे ग्रामीण भागांमध्ये विखुरलेला मतदार संघ. सदैव भुकेला असाच मतदारसंघ असून या मतदार संघाची नेमकी नस ओळखून कामांना सुऊवात करणारे मयेचे सुपुत्र शांत सुस्वभावी परंतु विकासाप्रती जबरदस्त आक्रमकता दाखवून विकास साधलेले आमदार प्रेमेंद्र शेट यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्याविषयी.. माझी सभापती स्वर्गवासी अनंत विष्णू शेट यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात उतरून सर्वप्रथम पंच सदस्य व आता आमदार बनलेले प्रेमेंद्र शेट यांनी अवघ्या एका वर्षात आपली प्रतिमा, प्रतिष्ठा, कार्यतत्परता, कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे. गेल्या एका वर्षात शेकडोच्या घरात विविध प्रकल्पांची पायाभरणी, विविध प्रकल्प पूर्ण करून त्यांचे उद्घाटन. तसेच नवनवीन विकास योजना याद्वारे मये मतदारसंघात जणू विकासाची गंगा आणली आहे. पायाभूत सुविधा व साधनसुविधांच्या विकासाबरोबरच मानवी विकासावरही त्यांनी विशेष भर दिला असून आपल्या सुपीक डोक्यातून व संकल्पनांतून मये मतदारसंघ चाळीसही मतदारसंघांमध्ये एक आदर्श मतदारसंघ कसा बनणार याचे जणू स्वप्नच बाळगून ते दिवस रात्र काम करीत आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप पक्षातर्फे ज्यावेळी प्रेमेंद्र शेट यांना निवडणूक उमेदवार घोषित करण्यात आले, त्यावेळी त्यांच्याबद्दल विरोधी पक्ष व उमेदवारांनी विविध प्रकारचे आरोप केले होते. या सर्व आरोपांना कधीही आपल्या तोंडातून किंवा शब्दातून उत्तर न देता थेट आपली कार्यक्षमता सिद्ध करूनच उत्तर देणार असा चंगच जणू प्रेमेंद्र शेट यांनी बांधला होता. आणि त्याच अनुषंगाने स्वत:वरील सर्व आरोप खोटे ठरवून आज त्यांनी मतदारसंघांमध्ये आपली वेगळी ओळख आणि छाप निर्माण केली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मये मतदारसंघाची खरी गरज प्रेमेंद्र शेट यांनी ओळखली. उगाच मोठमोठ्या प्रकल्पांसाठी हट्ट धरून वेळ वाया न घालता सध्या मतदारसंघासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष दिले. मतदार संघातील रस्ते, वीज व्यवस्था व पाणीपुरवठा याकडे विशेष लक्ष देताना त्यांनी या तीनही क्षेत्रांमध्ये काम केले. ग्रामीण भाग असल्याकारणाने या मतदारसंघात या तीनही सुविधांची नितांत गरज होती, ती गरज ओळखून त्यांनी काम करायला सुऊवात केली.
मळे गावचे सुपुत्र असल्याने तसेच राजकारणात मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये तसेच गावागावातील प्रत्येक वाड्यावर संबंध असलेल्या प्रेमेंद्र शेट यांनी आमदार झाल्यानंतर रस्ते सुधारण्याची प्रक्रिया हाती घेतली. त्याचबरोबर वीज व्यवस्थेत सुधारणा करताना भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम विक्रमी काळात पूर्ण केले. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिरगावात झालेले काम. जल हे जीवन मानून मतदारसंघातील प्रत्येक घरात नळाद्वारे नियमित पाणी पोहोचावे, यासाठी त्यांनी विशेष काम केलेच, त्याशिवाय गावागावांमध्ये असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांना पुनर्जीवन प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. शिरगावातील धोंडांची तळी याचा विस्तार, पिळगाव येथील महादेव मंदिरासमोर असलेली तळी याचे नूतनीकरण, कुडचिरे येथे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असलेल्या एका तलावाला देण्यात आलेले पुनर्जीवन, त्याचप्रमाणे कृषिप्रधान असलेल्या या मतदारसंघातील काही गावात बहरणारी शेती पुन्हा बहरावी यासाठी भगदाडे पडलेल्या पारंपारिक बांधांची सुधारणा व पुनर्बांधणीसाठी त्यांनी प्राधान्य दिले. मतदारसंघातील म्हावळींगे या गावातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा प्रत्येक निवडणुकीत डोके वर काढत होती. या गावातील लोकांनी सोसलेल्या वेदना त्रास यामुळे या गावातील त्रस्त झालेल्या लोकांनी गेल्या निवडणुकीत भाजपला मतदान केले नव्हते व ते जाहीरपणे ही बोलतही होते. परंतु या गावातील अंतर्गत रस्ता पूर्णपणे बांधून देण्याचे ध्येय आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मनाशी बाळगले होते. आणि त्या ध्येयाने झपाटून त्यांनी तांत्रिक अडचणी असलेल्या या रस्त्याच्या कामात एक सुवर्णमध्य काढला व गावातील सर्व रस्ते हॉटमिक्सिंग डांबरीकरणाने चकाचक करून सोडले. याचा परिणाम म्हणून विरोधात असलेल्या तीन पंच सदस्यांनी थेट या कामाच्या बळावरच आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे संपूर्ण गावाने ही त्रिवेंद्र शेठ यांना पाठिंबा दर्शविला. मयेतील जटील असलेल्या कस्तोडियन या विषयावर सरकारकडून लोकांना सनदी देण्याचे काम सुरू आहे. हे काम अती सुलभ होण्यासाठी सरकार दरबारी मागणी करून त्याच्या सुनावण्या पणजी ऐवजी डिचोलीत व्हाव्यात यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना यश आले. त्याचप्रमाणे आपल्या मनातील अस्तित्वाचे कोणतेही तीन दाखले सादर करण्याची अट एका दाखल्यावर त्यांनी आणली त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली लोकांनाही पणजी जाण्याऐवजी डिचोलीत सेवा मिळू लागली. निवडणूक काळात आपल्यावर झालेले सर्व आरोप टीका तसेच वर्तवण्यात येणारी शक्यता त्यांनी आपल्या कार्यातून फोल ठरवली आहे एक शांत सुस्वाभावी तसेच जमिनीवर पाय ठेवून वावरणारे आमदार म्हणून आज त्यांची संपूर्ण मये मतदारसंघात लोकप्रियता आहे. कोणत्याही कामात एकदा लक्ष घातले की ते काम पूर्ण होईपर्यंत स्वस्थ न बसणारे आमदार मतदारसंघाला लाभले असून येणारी चार वर्षे या मतदारसंघाचा कायापालट करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे हे स्वप्न पूर्ण करणारच हा त्यांचा ध्यास आहे.
परिचित









