आचरा | प्रतिनिधी
आचरा हायस्कूलच्या दगडी कुंपणा लगतच कलमांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची आचरा हायस्कूलचे कर्मचारी भाई बागवे आणि पि . के . आचरेकर यांनी सुखरूप सुटका केली. सापडलेल्या अजगरावर औषधोपचार करून सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यांच्या या कार्याबद्धल हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक गुटूकडे यांनी कौतुक केले आहे.









