अभिनिक्षक मंडळाच्या बैठकीत निर्णय
ओटवणे | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह येथे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासह सावंतवाडीतील जिल्हा कारागृहासाठी रुग्णवाहिका मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी. गायकवाड अध्यक्षतेखाली झालेल्या अभिनिक्षक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ओरोस जिल्हा कारागृहाचे अधिक्षक संजय मयेकर, सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे, अभिनिक्षक मंडळाचे इतर सदस्य व दोन्ही कारागृहाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी ओरोस जिल्हा कारागृहाचे अधिक्षक संजय मयेकर, सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतिश कांबळे यांनी कारागृहाच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.









