भाग्यात लिहिले असेल, तर अठरा विश्वे दारिद्र्यात असणारी व्यक्तीही श्रीमंत होते, असे अनेकदा दिसून आले आहे. ब्रिटनच्या हार्टफोर्डशायर येथे वास्तव्य करणाऱ्या दोन भावांना याचे प्रत्यंतर आले आहे. त्यांची नावे टेरी बालिग्ज आणि डॅनी बिलिग्ज अशी त्यांची नावे आहेत. ते नेहमी आपल्या आईसह लॉटरीची तिकीटे खरेदी करत असत. हे कुटुंब अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत होते. पण कधीना कधी आपल्या लॉटरी लागेल आणि आणि आपले दैन्य दूर होईल, अशी त्यांची आशा होती. ती उराशी बाळगतच आईने काही वर्षांनंतर देह ठेवला.
मात्र, जाताना आईने आपल्या मुलांना एक उपदेश केला. विशिष्ट क्रमांकांवर नेहमी लॉटरी खेळत जा. एकना एक दिवस तुझे भाग्य फळफळणार आहे, असा माझा विश्वास आहे, असे मातेने मुलांना सांगितले आणि काही काळानंतर आईचा आजाराने मृत्यू झाला. आईने मृत्यूशय्येवर असताना दिलेला हा सल्ला मुलांनी मानण्याचा निर्धार केला. ते त्या विशिष्ट क्रमांकावर नेहमी लॉटरी खेळत राहिले. असे अनेक महिने गेले. आईचे भाकित खरे ठरण्याची काही चिन्हे दिसेनात. तथापि, या भावंडांनी धीर सोडला नाही. ते या क्रमांकांवर लॉटरी खेळतच राहिले. काही काळानंतर खरोखरच या क्रमांकांनी त्यांना 1 लाख पौडांचे बक्षिस मिळवून दिले. तसा ईमेल लॉटरी कंपनीकडून या भावांना पाठविण्यात आला. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ते अकस्मात कोट्याधीश झालेले आहेत.









