एनडीआरएफ’ने 30 जखमींना वाचवले
वृत्तसंस्था /ऋषिकेश
उत्तराखंडमधील ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुऊवारी एक भीषण अपघात टळला. चामधर येथील धारीदेवी मंदिराजवळ सुमारे 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरच उलटली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बरेच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर मदत व बचावकार्य करून सर्वांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी राजस्थानमधील जयपूर येथील असल्याचे सांगण्यात आले. ते सर्वजण चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये आले होते. बद्रीनाथला भेट देऊन घरी परतत असतानाच त्यांच्या बसला अपघात झाला.









