कारवार – दुचाकी वाहनावरून पिता आणि मुलगी प्रवास करत असताना सिबर्ड बसने धडक दिल्याने लहान मुलगी जागीच ठार झाल्याची घटना कारवार शहराच्या बिणगा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर घडली . बेंगळूरहुन कारवारला येणाऱ्या सिबर्ड बसने ही धडक दिली आहे. लविता जार्ज फर्नांडिस (वय १३) अशी मृतांची ओळख पटली आहे. घटनेत पिता जार्ज फर्नांडिस देखील जखमी झाले आहेत. कारवारच्या क्रीम्स इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहे . कारवार वाहतूक पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









