मुंबई
ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटलचा समभाग सोमवारी शेअर बाजारामध्ये दमदारपणे लिस्ट झाला. सदरचा समभाग 32 टक्के प्रिमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. एनएसईवरती कंपनीचा समभाग 973 रुपयांवर खुला झाला होता. कंपनीने समभागाची इशू किंमत 735 रूपये ठेवली होती. बीएसईवर 31 टक्के वाढीसह 960 रुपयांवर समभाग लिस्ट झाला होता. कंपनीने आयपीओंअंतर्गत 869 कोटी रुपये उभारण्याचा मानस केला आहे.









