वृत्तसंस्था / मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील अ गटात येथे सुरू असलेल्या सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने पहिल्या डावात 441 धावा जमवित महाराष्ट्रावर 173 धावांची आघाडी घेतली आहे. श्रेयस अय्यर आणि म्हात्रे यांनी दमदार शतके झळकविली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावात 1 बाद 142 धावा केल्या.
या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 126 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर मुंबईने 3 बाद 220 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 103.1 षटकात 441 धावांवर आटोपला. म्हात्रेने 232 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 173 तर श्रेयस अय्यरने 142 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 142 धावा जमविल्या. कोटियानने 2 चौकार, 2 षटकारासह 28, रहानेने 31 धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे हितेश वळुंजने 134 धावांत 6 गडी बाद केले. मुंबईने पहिल्या डावात 315 धावांची भक्कम आघाडी घेतली. मुंबईने या सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दरम्यान महाराष्ट्राने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत दिवसअखेर 31 षटकात 1 बाद 142 धावा जमविल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड 1 षटकार 12 चौकारांसह 81 तर सचिन धास 1 षटकार आणि 7 चौकारांसह 59 धावांवर खेळत आहेत. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून मुंबईचे पारडे महाराष्ट्राच्या तुलनेत जड वाटते.
संक्षिप्त धावफलक: महाराष्ट्र प. डाव सर्व बाद 126, मुंबई प. डाव 441 (म्हात्रे 176, श्रेयस अय्यर 142, रहाने 31, कोटियान 28, वळुंज 6-134), महाराष्ट्र दु. डाव 1 बाद 142 (गायकवाड खेळत आहे 81, सचिन धास खेळत आहे 59)









