वृत्तसंस्था/ नागपूर
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकाविरुद्ध विदर्भने पहिल्या डावात 86 षटकात 3 बाद 261 धावा जमवल्या. सलामीच्या अथर्व तायडेने शानदार शतक (109) झळकवले. यश राठोडचे शतक सात धावांनी हुकले.
या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून विदर्भला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा शोरे 12 धावावर पायचित झाला. त्यानंतर अथर्व तायडे आणि यश राठोड यांनी दुसऱ्या गड्यासाठी 184 धावांची शतकी भागीदारी केली. राठोडने 157 चेंडूत 12 चौकारासह 93, तर तायडेने 244 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह 109 धावा जमवल्या. दिवसअखेर करुण नायर 5 चौकारासह 30 धावावर तर कर्णधार अक्षय वाडकर 2 धावावर खेळत आहेत. कर्नाटकातर्फे कविरप्पा, कौशिक आणि हार्दिक राज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ प. डाव 86 षटकात 3 बाद 261 (अथर्व तायडे 109, यश राठोड 93, शोरे 12, करुण नायर खेळत आहे 30, वाडकर खेळत आहे 2, कविरप्पा, कौशिक, हार्दिक राज प्रत्येकी एक बळी









