न्हावेली / वार्ताहर
सविस्तर वृत्त असे की, मळेवाड आरोंदा रस्त्यावर खरी येथे उतारावर पाण्याच्या पाईप लाईन साठी रस्ता घोदून पाईप लाईन घातली होती.त्यानंतर संबंधित ठेकेदाराने या खोदलेल्या रस्त्यावर काँक्रिट घालून खोदलेला रस्ता सुरळीत केला होता.मात्र यावर घातलेलं काँक्रिट आता निघून त्या ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले आहेत. हे खड्डे उतारावर असल्याने तसेच पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्याने वाहन धारकांना याचा त्रास होत आहे.त्यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरी संबंधित ठेकेदाराने या बाबत लवकरात लवकर पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









