फ्रान्समध्ये घेतले जाते विशेष बटाटय़ाचे पीक
बटाटय़ाचा स्वयंपाकात वापर न करणारे स्वयंपाकघर जगात क्वचितच असेल. परंतु जगातील बटाटय़ाची सर्वात प्रजाती कुठे सापडते हे तुम्हाला माहित आहे का? सोशल मीडियावर या खास प्रकारच्या बटाटय़ाची सध्या चर्चा सुरू आहे. ‘ले बोनाटे’ नावाच्या बटाटय़ाला जगातील सर्वात महाग बटाटा मानला जातो. या बटाटय़ाची किंमत सोन्याच्या दागिन्यापेक्षाही अधिक असते.
‘ले बोनाटे’ नावाच्या या बटाटय़ाचे उत्पादन फ्रान्समध्ये अधिक प्रमाणात होते. येथील नॉर्मेंडी भागात या बटाटय़ाचे पीक घेतले जाते. हा एक विशेष प्रकारचा बटाटा आहे. हा बटाटा अत्यंत नाजूक असल्याने तो हाताने खणूनच बाहेर काढला जातो. या बटाटय़ाची उत्पादन प्रक्रिया याला आणखी विशिष्ट स्वरुप प्राप्त करून देते. या बटाटय़ात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्याने याची मोठी मागणी असते.

या प्रकारचा बटाटा भारतात सर्वसाधारणपणे मिळत नाही, कारण याचे खरेदीदार नसल्याने तो फ्रान्समधून मागविला जात नाहे. या बटाटय़ाचा वापर विशेषकरून वासयुक्त खाद्यपदार्थांकरता केला जातो. या बटाटय़ाला एक विशेष स्वाद प्राप्त आहे. बोनाटे बटाटय़ामध्ये उच्च फायबर, पोषक घटक, व्हिटॅमिन आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. यात प्रोटीन, आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ए आणि फोलिक ऍसिड यासारखे पोषक घटक अन् मिनरल्स असतात.
हा बटाटा कमी रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधूमेह यासारख्या आजारांना रोखण्यास मदत करतो. ले बोनाटे या प्रकारातील एक किलो बटाटे खरेदी करण्यासाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागतात. बटाटय़ाचा हा दर भारतीयांना निश्चितच खूपच अधिक वाटणारी आहे. या बटाटय़ाला दुर्लभ प्रजातीच्या शेणीत सामील करण्यात आले आहे. हा बटाटा पूर्ण वर्षात फारच कमी दिवसांसाठी उपलब्ध असतो. या बटाटय़ाचे पीक घेण्यासाठी नैसर्गिक खताच्या स्वरुपात सागरी शेवाळाचा वापर करण्यात येतो. इले डे नॉर्मोटियर बेटावर याचे पीक घेतले जाते, येथील 10 हजार टन बटाटय़ांपैकी केवळ 100 टन ला बोनाटे बटाटय़ांना विक्रीसाठी वेगळे केले जात असते.









