धारबांदोडा : धारगे–साकोर्डा येथील श्रीमती तृप्ती तुळशीदास गावकर यांच्या घराची समोरील भिंत कोसळून सुमारे एक लाख रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली. सदर घटना शुक्रवार 28 जुलै रोजी घडली होती. संततधार पावसामुळे घराच्या समोरील भिंत कोसळली आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे गेल्या एक महिन्यापुर्वी तीचा पती आजाराने वारला होता. तृप्ती गावकर यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाखीची असून तिला दोन मुले आहेत. मुलगी सध्या नसिर्गचे शिक्षण घेत असून मुलगा बारावीच्या वर्गात शिकत आहे. घरातील बहुतेक सामान हे कोसळलेल्या भिंतीखाली पडून आहे. दोन दिवस उलटूनही भिंतीखाली आलेले सामान काढण्यासाठी कुणीच पुढे सरसावले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Articleपाण्यात अडकलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश
Next Article वाढीव घरपट्टीला बोरी ग्रामसभेत प्रखर विरोध
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.