सावंतवाडी कोमसापतर्फे आयोजन
सावंतवाडी : प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत काव्यफुलांच्या बरसातीने आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोजागरीचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी-कवयित्रींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वेचक-वेधक अशा कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले. बेळगाव येथील कवी तथा कोमसापचे ज्येष्ठ सदस्य वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. प्रारंभी कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते वाय. पी. नाईक यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या ग्रामीण भागातील जीवन जिवंत उभ्या करणाऱ्या कवितेने संमेलनास प्रारंभ झाला. कोजागरीला आकाशी चंद्र चांदण्याची साथ घेत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या शेजारी असलेल्या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात कोजागरी कवी संमेलन मैफिलची सांज रंगली.
गतवर्षी केशवसुत कट्टा येथे कोजागिरी कवी संमेलन मैफिल घेण्यात आली होती. यंदाचे हे दुसरे वर्ष . कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळी कवी संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर कोमसापाचे अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत काव्यफुलांच्या बरसातीने आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोजागरीचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात खुल्या कविसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते. कवी-कवयित्रींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वेचक-वेधक अशा कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले. बेळगाव येथील कवी तथा कोम सापचे ज्येष्ठ सदस्य वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. प्रारंभी कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते वाय. पी. नाईक यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या ग्रामीण भागातील जीवन जिवंत उभ्या करणाऱ्या कवितेने संमेलनास प्रारंभ झाला. कोजागिरी ला आकाशी चंद्र चांदण्याची साथ घेत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या शेजारी असलेल्या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात कोजागरी कवी संमेलन मैफिल ची सांज रंगली
गतवर्षी केशवसुत कट्टा येथे कोजागिरी कवी संमेलन महफिल घेण्यात आली होती यंदा चे हे दुसरे वर्ष कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळी कवी संमेलनाला सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर कोमसापाचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, जिल्हा खजिनदार भरत गावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, म. ल.देसाई , उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सुहासिनी सडेकर, दीपक पटेकर, प्रा रुपेश पाटील, प्रज्ञा मातोंडकर ,मंगल जोशी -नाईक, ऋतुजा सावंत भोसले, मानसी भोसले, रामदास पारकर, प्रा. डॉ. गणेश मर्गज ,प्रा. एन डी कार्वेकर, विकास गोवेकर, किशोर वालावलकर, मनोहर परब ,दत्ताराम सावंत ,संतोष पवार आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री नाईक म्हणाले मनातलं गाव नेहमी आठवतं . बालपण लाल मातीशी नाळ जोडतं. शेत, झाड, जनावरे आठवतात . नांगर हकताना बैलाची संगत मनात कोरलेली आहे . आजही ही कविता त्यांनी सादर करत कोमसापच्या साहित्य चळवळीविषयी आपले योगदान स्पष्ट करत अशी कवी संमेलने व्हायला हवी. या माध्यमातून नवोदित कवी तयार होण्यास चालना मिळत आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.









