स्व.फटी गावकर चौथ्या संगीत संमेलनाचे उद्घाटन
प्रतिनिधी/वाळपई
ग्रामीण भागामध्ये संगीत संमेलनाच्या आयोजन ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे .अशा संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये संगीत क्षेत्रामध्ये नवीन कलाकार निर्माण होत असतात. मात्र या कलाकारांनी सातत्याने रियाज करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हल्लीच्या काळामध्ये गोमंतकीय कलाकार व्यासपीठ गाजवताना कमी पडत आहे ही गोव्यासाठी खेदजनक बाब आहे. यामुळे येणाऱया काळात गोव्यातील कलाकारांनी संगीत क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करावा त्यासाठी कला व संस्कृती संचालनालय सातत्याने पाठबळ देणार आहे असे आश्वासन या खात्याचे उपसंचालक अशोक परब यांनी केले आहे. भूमिक्रीएशन व सत्तरी संगीत संमेलन आयोजन समिती
कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. फटी गावकर स्मृती चौथ्या संगीत संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठाणे सत्तरी येथील नवदुर्गा देवस्थानच्या प्रांगणात एकदिवशीय संमेलनाचे पारंपरिक समय प्रज्वलित करून थाटात उद्घाटन करण्यात आले. नितेश देसाई यांनी सादर केलेल्या सुंदर ईशस्तवनाने या संमेलनाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण गावस सचिव झिलू गावकर, स्थानिक पंच सभासद निलेश परवार, माजी जिल्हा पंचायत सभासद पांडुरंग गावकर, देवस्थानचे रामा गावकर, गुरुदास गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अशोक परब यांनी सांगितले की कला व संस्कृती संचालनातर्फे विविध शाळेमध्ये संगीत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संगीत शिक्षकांनी नवीन संगीत कलाकार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आवाहन यावेळी त्यांनी केले.
फुटी गावकर हे हाडाचे भजनी कलाकार होते. त्यांनी ग्रामीण भजनी कलेला सातत्याने वाव देण्याचा प्रयत्न केला?. त्यांच्या नावाने सत्तरी तालुक्मयामध्ये अशा प्रकारचे संगीत संमेलन आयोजित होत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले व अशा प्रकारच्या संगीत संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये गायन क्षेत्रामध्ये नवीन कलाकार निर्माण होण्यास अजिबात विलंब लागणार नाही असे सांगितले.
मात्र अशा कलाकारांना सातत्याने व्यासपीठ प्राप्त होणे काळाची गरज आहे .यासाठी संस्कृती संचालनालय आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे.
स्थानिक पंच सभासद निलेश परिवार यांनी यावेळी बोलताना पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिल होते गावकऱयांनी सातत्याने ग्रामीण भागातील भजनी कलाकारांना प्रोत्साहित केले सत्तरी तालुक्मयाच्या ग्रामीण देवस्थानामध्ये सुरू असलेले पारंपारिक भजनी कला बंद पडू नये यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे महत्त्वाचे होते सत्रे तालुक्मयातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आलात अनेक जणांना सातत्याने मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला यामुळे त्यांच्या नावाने संगीत संमेलनाचे आयोजन ही खरोखरच चांगली बाब असल्याचे यावेळी ते म्हणाले.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे चंद्रकांत नाईक,उत्तम गावकर, बाळकृष्ण गावकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. पारंपारिक समई प्रज्वलित करून व स्वर्गीय फटी गावकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले तर शेवटी अंकुश धुरी यांनी आभार व्यक्त केले.









