रामपूरमध्ये ट्रॅकवर सापडला लोखंडी खांब : लोकोपायलटच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
वृत्तसंस्था/रामपूर
गेल्या अनेक दिवसांपासून गाड्यांची तोडफोड आणि रेल्वे ऊळ उखडण्याच्या घटना समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये नवे प्रकरण समोर आले आहे. येथे बिलासपूर आणि ऊद्रपूर शहरादरम्यान दून एक्स्प्रेस ऊळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. टेन क्र. 12091 च्या लोको पायलटला ऊळावर 6 मीटर लांबीचा लोखंडी खांब निदर्शनास आला. चालकाने सतर्कतेने टेन थांबवून ट्रॅकवरील अडथळा दूर केल्यानंतर टेन सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10.18 वाजता टेन क्रमांक 12091 च्या लोको पायलटने ऊद्रपूर शहराच्या स्टेशन मास्टरला बिलासपूर रोड ते ऊद्रपूर शहरादरम्यान रेल्वे ट्रॅकवर 6 मीटर लांबीचा लोखंडी खांब सापडल्याची माहिती दिली. यानंतर चालकाने टेन थांबवून ट्रॅकवरील लोखंडी पोल बाजूला केला. त्यानंतर टेन सुरक्षितपणे पुढे नेण्यात आली.
गेल्या काही दिवसात रेल्वे अपघात घडविण्यासाठी वेगवेगळी कारस्थाने सुरू असल्याचे प्रकार वाढले आहेत. अलिकडेच कानपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर एलपीजी सिलिंडर ठेवण्यात आला होता आणि येथून जाणारी कालिंदी एक्स्प्रेस अपघातातून थोडक्मयात बचावली होती. यानंतर अजमेरमध्येही रेल्वे ट्रॅकवर सिमेंटचे ब्लॉक टाकण्यात आले. त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिह्यात रेल्वे ट्रॅकवर लाकडाचा मोठा तुकडाही आढळला होता. हे लाकूड इंजिनमध्ये अडकल्याने स्वतंत्र संग्राम सेनानी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती सुमारे 2 तास खोळंबली होती.
16-17 ऑगस्टच्या रात्री कानपूर-झाशी मार्गावर साबरमती एक्स्प्रेसचे (19168) इंजिनसह 22 डबे ऊळावरून घसरले होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. इंजिनला बोल्डर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून सध्या या अपघाताचीही चौकशी सुरू आहे. या सर्व घटना पाहता रेल्वे ट्रॅकची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा गस्त घालत असताना दिवसा लोकांना जागऊक करत असताना रात्रीच्या वेळीही पोलीस पथके रेल्वेऊळांवर गस्त घालत आहेत. तरीही काही समाजकंटकांकडून कट-कारस्थाने सुरूच आहेत. वंदे भारत सारख्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या आलिशान रेल्वेगाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकारही वेगवेगळ्या मार्गावर यापूर्वी झालेले आहेत.









