माणसाने विज्ञानाद्वारे खूप काही साध्य केले आहे, परंतु टाइम ट्रॅव्हलिंग अद्याप शक्य झालेले नाही. परंतु एका ठिकाणी टाइम ट्रॅव्हल करणे काही प्रमाणात शक्य आहे. येथे तुम्ही भविष्याला स्पर्श करुन परत येऊ शकता. डायोमीड नावाचे एक बेट असून ते दोन हिस्स्यांमध्ये विभागलेले आहे. याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचताच तुम्ही भूतकाळातून भविष्यात पोहोचता. डायोमीड बेट दोन हिस्स्यांमध्ये असून याची नावे बिग डायोमीड आणि लिटिल डायोमीड आहेत. यांच्यामधील अंतर केवळ 4.8 किलोमीटर आहे. परंतु प्रशांत महासागरातून जाणारी इंटरनॅशनल डेटलाइन या दोन्ही हिस्स्यांमधून जाते. या यात्रेत एका दिवसाचा फरक होतो. इंटरनॅशनल डेट लाइन काल्पनिक रेषा असून ती भौगोलिक दृष्ट्या उत्तर ध्रूवापासून दक्षिण ध्रूवापर्यंत जाते. ही रेषा कॅलेंडरचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील अंतर आहे. याचमुळे डायोमीडच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाताना कॅलेंडरचा दिवस बदलतो आणि माणूस भूतकाळातून भविष्यात पोहोचतो आणि भविष्यातून भूतकाळात पोहोचतो.
जाण्यास आहे मनाई
हा भाग अत्यंत थंड असल्याने हिवाळ्यात दोन्ही हिस्स्यांदरम्यान एक पूल तयार होतो. याच्या माध्यमातून एका हिस्स्यातून दुसऱ्या हिस्स्यात पायी जाता येते. जर तुम्ही रविवारी एका कोपऱ्यातून चालत निघाल्यास दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचताच सोमवारची तारीख येते. याचमुळे बिग डायोमीडला टुमारो आणि लिटिल डायोमीडला यस्टरडे आयर्लंड म्हटले जाते. 16 ऑगस्ट 1729 रोजी डेनिश-रशियन खलाशी विटस बेरिंग यांनी याला शोधले होते. 1982 मध्ये अमेरिकेने रशियाकडून हे बेट खरेदी केली आणि दोन्ही देशांदरम्यान सीमा रेखांकन झाले. यानंतर 2 हिस्स्यांदरम्यान प्रवास अवैध ठरला.









