भाताचे कोठार अशी ओळख
भारत हा दऱ्याखोऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो, या दऱ्याखोऱ्या अत्यंत मनमोहन असून पर्यटकांना आकर्षित करत असतात. परंतु देशातील सर्वात खोलवर वसलेले ठिकाण कोणते या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नसावे. हे ठिकाण समुद्रसपाटीपेक्षा 2.2 मीटर खाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भातपिक घेतले जाते, यामुळे याला भाताचे कोठार देखील म्हटले जाते.
भारताचे नैसर्गिक स्वरुपात सर्वात खोलवर वसलेले स्थळ केरळचे कुट्टनाड आहे. हे क्षेत्र अलाप्पुझा, पथनमथिट्टा तसेच कोट्टायम जिल्ह्यांमध्ये फैलावलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून 1.8 मीटर ते 3 मीटर खाली आहे. येथे सर्वाधिक लांब सरोवर वेम्बनाड कायत देखील असून याची लांबी 96.5 किलोमीटर आहे. हे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात फैलावलेले असून अत्यंत सुंदर ओ. हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यानजीक असून एक संकीर्ण पर्वत याला समुद्रापासून वेगळे करते.
कुट्टनाड येथील बहुतांश भाग दलदलयुक्त आहे, परंतु काही भागाला सरोवर आणि नदीच्या हिस्स्याबाहेर काढण्यात आले आहे. तेथे बंधारा तयार करत शेती केली जाते. हा बंधारा सरोवरात समुद्राचे खारट पाणी येण्यापासून रोखतो. समुद्रसपाटीपेक्षा कमी उंची असल्याने येथे शेती करणे सोपे नाही, परंतु केबीएसएफएस प्रणाली अंतर्गत भूमीला अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे की येथे सहजपणे पिक घेता येईल. समुद्रसपाटीपेक्षा 2 मीटर कमी उंची असलेल्या ठिकाणी शेती केले जाणारे हे जगातील बहुधा एकमेव ठिकाण असल्याचे मानले जाते.
पूर्वी हा पूर्ण भाग सरोवराच्या पाण्यात बुडालेला असायचा, परंतु नंतर पोल्डर तयार करत येथील जमिनीला शेतीयोग्य करण्यात आले. कधीकाळी जलाशय किंवा नदीच्या पात्रात असलेल्या परंतु नंतर बंधारा तयार करत जलमुक्त केलेल्या क्षेत्राला पोल्डर म्हटले जाते. कुट्टनाड येथे ताडी लोकप्रिय पेय आहे. हा भाग उंच नारळासाठी देखील ओळखला जातो.









