नारायण राणेंचे मराठा आरक्षणासंदर्भातले ते भाष्य योग्यच ; प्रवीण भोसले
सावंतवाडी प्रतिनिधी
समाजकारण व राजकारणातील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. शेवटपर्यंत ती समाजकारणातच कार्यरत असते. आमचे आता वय झालं किंवा आम्ही राजकारण समाजकार्यात अनेक चढ-उतार अनुभवले. म्हणून कधी आम्ही निवृत्तीची घोषणा केली नाही. कारण ,आम्ही समाजकारणात नेहमीच कार्यरत असतो. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी जी निवृत्तीची घोषणा केली ते कित्येक वर्ष समाजकारण राजकारणात कार्यरत आहेत . त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला तो निर्णय असा कसा काय घेतला त्यांच्या निर्णयाबाबत त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच त्यांची समजूत काढावी आणि त्यांना सांभाळावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मराठा समाज आणि कुणबी हे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर सरसकट कुणबी मराठा समाज बाबत केलेले भाष्य हे योग्य आहे. श्री भोसले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची री ओढली आहे. मनोज जरंगे पाटील यांची ही भूमिका योग्य आहे . मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुणबी बाबतचे विधान केले आणि मराठा आरक्षणासंदर्भात जे भाष्य केले ते योग्यच आहे असेही भोसले म्हणाले.









