बाहेरून हलकी व कडक व आतून एकदम नरम असणारी बालुशाही सर्वानाच आवडते.बालुशाही खाल्ल्यावर आपल्या तोंडात ती मिसळून जाते. सण असो वा नसो पण बालूशाहीचा आस्वाद नक्कीच घेतला जातो.आज आपण घरच्याघरी हि परफेक्ट बालुशाही कशी बनवायची ते पाहुयात.
बालुशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• २ कप मैदा
• १/४चमचा मीठ
• १ चमचा बेकिंग पावडर
• १/४ कप साजूक तूप
• १ कप पाणी
• १ १/२ कप साखर
• कप पाणी
• वेलची पूड
• खायचा रंग
• तळण्यासाठी तेल
एका बाउलमध्ये ३/४ कप पाणी, वितळवलेलं तूप,चवीनुसार मीठ, १ चमचा बेकिंग पावडर एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर बाउलमध्ये दोन कप मैदा मिक्स करा.सर्व सामग्री एकजीव करून घ्या. पुन्हा थोडासा मैदा मिक्स करून पीठ मळून घ्या आणि २० मिनिटांसाठी पीठ सेट होण्यास ठेवून द्या.
पॅनमध्ये दीड कप साखर घ्या आणि त्यात १/४ कप पाणी मिक्स करा. गॅसच्या मध्यम आचेवर साखरेचा पाक तयार करा.पाक थंड झाल्यावर त्यात वेलची पूड टाका.यानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घ्या. पिठाचे लहान- लहान आकाराचे गोळे तयार करा. गोळ्यांना डोनटप्रमाणे आकार द्यावा.पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर बालूशाही दोन्ही बाजूंनी १५ मिनिटांसाठी ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या.बालूशाही नीट फ्राय झाल्यानंतर ३० ते ४० मिनिटांसाठी साखरेच्या पाकात बुडवून ठेवा.
Previous ArticleKas Pathar : कास पठारावरील फुलांचा हंगाम १0 सप्टेंबर पासून सुरू
Next Article शहरात चक्काजाम..!









