न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी बाहेरचावाडा येथील शेहबाज बागवान हे आपल्या मालकीच्या एम ०७२४४७ या ह्युंडाई गाडीने नातेवाईकांना सोडण्यासाठी सावंतवाडी मळगाव रेल्वेस्टेशनवर गेले असता गाडी पार्क करुन ते रेल्वे स्थानकावर जात असताना त्यांच्या गाडीमध्ये शॅार्टसर्कीट होऊन गाडीने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.याबाबतची माहिती शेहबाज बागवान यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत गाडीचा पंचनामा केला. याचा अधिक तपास सुरु आहे.
अधिक माहिती अशी की, पहाटे ५ च्या सुमारास मळगाव सावंतवाडी रोड स्थानकात घडली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानकातील फायर सिंलेडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित रिक्षा चालक आणि दिलेल्या माहितीनुसार सदर गाडी पार्क केल्यानंतर गाडीच्या इंजिनच्या भागात वास येत असल्याचे सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही आग लागली व काही वेळातच आग भडकली.









