पुंछ
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) शनिवारी एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घालण्यात आले आहे. मेंढर सब डिव्हिजनच्या बालाकोट सेक्टरमध्ये तैनात जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर मारला गेला आहे. हा घुसखोर भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली









