जोसेफ स्कवेरा यांचे स्पष्टीकरण : वळणावर पुतळा असल्याने अपघाताची भीती,चुकीची माहिती पसरविल्यामुळे कळंगुटमध्ये धार्मिक तेढ
म्हापसा : कळंगुटमध्ये ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्याठिकाणी अपघाती वळण होते. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तो पुतळा येत्या 10 दिवसात बाजूला करून अन्यत्र ठिकाणी उभारावा असे आपण नोटीसीद्वारे स्वराज संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांना कळविले होते मात्र त्यांनी त्याचा दुसराच अर्थ काढून पत्रकारांना सांगितल्याने कळंगुटमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाला, असे स्पष्टीकरण कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पंच अॅनी कुयेलो, सावियो गोन्साल्वीस, उपसरपंच गीता परब, स्वप्नेश वायंगणकर, माथायस फर्नांडिस, श्री. रॉड्रिगीस उपस्थित होते. कळंगुटमध्ये जे कुणी पंचायतीमध्ये शिवप्रेमी आले होते त्यांना आपण दोषी न धरता आपण स्वराज संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांना दोषी धरतो. त्यांनी शिवप्रेमीत चुकीची माहिती दिली, असा आरोप जोसेफ सिक्वेरा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. नोटीसीत आपण कुठेच जमिनदोस्त करणार म्हटले नाही.
अपघाती वळणामुळे तेथे पुतळा उभारण्यास विरोध
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दि. 3 जून रोजी रात्री 11 वा. उभारण्यास सुऊवात कऊन पहाटे 5 वा. तो पूर्ण करण्यात आला. तेथे त्यांना परवानगीही नव्हती. जेथे पुतळा उभारण्यात आला तेथे पाच रस्ते आहेत व हे अपघाती वळण असल्याने आम्ही तिथे पुतळा उभारण्यास परवानगी दिली नव्हती. दुसऱ्या ठिकाणी यापेक्षा मोठा पुतळा व किल्ला उभाऊया असेही आपण त्यांना सांगितले होते. आपल्याला महाराजांबद्दल आदर आहे. आपण मराठीत शिकलो आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल आपण सर्व माहिती आहे, असेही जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.
सर्व पंच सदस्यांच्या उपस्थितीत ठराव घेतला
आम्ही पंचायतीमध्ये ठराव घेतला त्यावेळी सर्व पंच उपस्थित होते. त्यावेळी सुनिता मयेकर व प्रसाद शिरोडकर उपस्थित होते. मात्रा आता ते नाही म्हणातात. नंतर 19 जून रोजी पत्र लिहिले ते सर्वांना पाठवले. त्याचदिवशी स्वराज संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकरांना सर्व कागदपत्रांसह लेखी पत्र लिहिले की तो मधोमध असलेला पुतळा काढून अन्यत्र उभारा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आपणास आदर
असे नाही की आपल्यास छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काहीच माहिती नाही. शाळा आपण मराठीतून शिकलो आहे, त्यामुळे महाराजांच्या कार्याबद्दल, विचारांबद्दल सर्व माहीत आहे आणि त्याचा आपण आदर करतो. त्यामुळे आपण फोंड्याप्रमाणे येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभाऊया असे त्यांना सांगितले होते मात्र त्यांना राजकारण करायचे आहे. त्यांना जे करायचे ते कऊ द्या मात्र त्यात शिवाजी महाराजांना आणू नका. मी कुठल्याच धर्माचा तिरस्कार करत नाही उलट आदर करतो, असे जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.









