वृत्तसंस्था/ सेंट डेनिस, फ्रान्स
अमेरिकेच्या 4×400 मी. मिश्र रिले संघाने नवा विक्रम केला. पण अंतिम फेरीत तो मोडला जाण्याची शक्यता आहे. व्हरनॉन नॉरवूड, शॅमियर लिटल, ब्राईस डेडमॉन, केलीन ब्राऊन यांनी प्राथमिक फेरीत 3 मिनिटे 7.41 सेकंदात शर्यत पूर्ण करून नवा विश्वविक्रम केला. गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 3:08.80 से.चा विक्रम नोंदवला होता. तो विक्रम अमेरिकन संघाने मागे टाकला









