आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रयत्न करणे गरजेचे : आरोग्य खात्याकडून कार्यवाही झाल्यास रुग्णालय सेवेत
खानापूर : खानापुरात नव्याने बांधलेले माता शिशू रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीचे निवडणुकीपूर्वी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी घाईगडबडीने वास्तूपूजन केले होते. मात्र यानंतर उद्घाटनासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसल्याने माता शिशु ऊग्णालयाचे उद्घाटन अद्याप रखडल्याने सुसज्ज इमारतच खानापूरवासियांना पहावी लागत आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी स्वत: डॉक्टर असल्याने वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी तालुक्याच्या विविध भागात नव्याने रुग्णालय मंजूर करून घेतले होते. खानापूरसाठी 60 खाटांचे माता शिशू रुग्णालय आणि शंभर खाटांचे दुसरे रुग्णालय मंजूर करून घेतले होते. माता शिशू रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाचा पाठपुरावा करून पूर्णत्वास नेले होते. निवडणुकीपूर्वी ऊग्णालयाचे उद्घाटन करण्याच्या हेतूने माजी आमदार निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न करून ही इमारत पूर्णत्वास नेली होती. मात्र त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले नाही. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी त्यांनी या रुग्णालयाचे वास्तुपूजन केले. हे ऊग्णालय लोकांच्या सेवेत लवकर ऊजू व्हावे हीच अपेक्षा खानापूर तालुक्मयातील जनता करत आहे. मात्र गेले सहा महिने याबाबत कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही.
आमदारांकडून पाठपुराव्याची गरज
खानापूर शहरात नव्याने मंजूर झालेले मात शिशू रुग्णालयाचे बांधकाम अतिशय जलदगतीने पूर्णत्वास नेण्यात आले. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी या रुग्णालयाचा उद्घाटन करण्याचा त्यांचा मनोदय होता. मात्र ते याबाबत कमी पडले. सध्या सुसज्ज इमारत तयार झाली असून यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून कर्मचारी वर्गाची नेमणूक होणे तसेच या रुग्णालयासाठी लागणारे अद्ययावत यंत्रसामग्री आरोग्य मंत्रालयाकडून मंजूर होणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर आरोग्य मंत्रालयात तसेच मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील किती वर्षे फक्त इमारतच पहावी लागेल.
सध्या कार्यरत असलेल्या रुग्णालयात माता शिशू विभागात प्रचंड रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे त्या ठिकाणी गरोदर माहिला आणि इतर रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा उपब्लध होत नाही. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच या माता शिशू रुग्णालयात खेरी या ठिकाणी शंभर खाटांचे रुग्णालय माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मंजूर करून घेतले आहे. या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.
कर्मचारी-वैद्यकीय सामग्री उपलब्ध केल्यास रुग्णालय सुरू करू
तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, इमारत पूर्ण झालेली आहे. मात्र ऊग्णालयासाठी कर्मचारी वर्ग अद्याप शासनाने मंजूर केलेला नाही. यासाठी शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे. तसेच या ऊग्णालयासाठीचे वैद्यकीय साहित्य आरोग्य खात्याने पुरवले पाहिजे. या दोन बाबींची पूर्तता झाल्यास लगेच हे ऊग्णालय नागरिकांच्या सेवेत ऊजू होऊ शकते.









