हजारो हिंदू एकत्र धारण करतील यज्ञोपवीत : देशभरातील संतमहंतांची पावन उपस्थिती
पणजी ; श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित, धर्मभूषण सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य अधिष्ठानाखाली श्री क्षेत्र तपोभूमी गुऊपीठावर आज दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता ‘श्रावणी’ विधी मोठ्या उत्साहात होणार असून तो एक जागतिक इतिहास होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी हजारो हिंदूधर्मीय उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर देश विदेशातील वरिष्ठ संतमहंतांची उपस्थिती लाभणार आहे. शिवानंद सरस्वतीजी सूर्यचंद्र योग आश्रम रोम-इटली, श्री बाबा हटयोगीजी, अधिपती – गौरीशंकर मंदिर गौशाला-हरिद्वार, महंत श्री ऋषीश्वरानंद स्वामीजी चेतन ज्योति आश्रम हरिद्वार, श्री योगी आशुतोषजी-योगगुरू दिल्ली, श्री महंत कृपालुदासजी – श्री दशरथ महल, अयोध्या-उत्तरप्रदेश आदि संतांची पावन उपस्थिती प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमात यज्ञोपवीत धारण, उत्सर्जन, उपाकर्म, तर्पण, हवन, मृत्तिका स्नान, मिंदवते होम, यमप्रार्थना, गोपूजन, सभादीपदान, रक्षाबंधन, सद्गुऊ पूजन आदी विविध धार्मिक विधी होणार आहेत. स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली गोव्यात हजारो भाविकांकडून यज्ञोपवीत धारण केले जाणार आहे. समस्त हिंदू धर्मियांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून हिंदू धर्माचरण करावे, असे श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे आवाहन करण्यात आले आहे.









