सरकारकडून दोन विशेष समित्यांची स्थापना
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडू सरकारने हत्ती कॉरिडॉरची एक यादी तयार करण्यासाठी दोन तज्ञ समित्यांची स्थापना केली आहे. दोन तज्ञ समित्या मार्चच्या अखेरपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या हत्ती कॉरिडॉरसह संभाव्य कॉरिडॉरची यादी उपलब्ध करणार असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे.
या समित्यांची स्थापना हत्ती कॉरिडॉरची ओळख पटविण्याठी करण्यात आली आहे. राज्याच्या उत्तरेत कोइम्बतूर, नीलगिरी, इरोड, सत्यमंगलम, हसनूर, होसूर आणि धर्मपुरी वन प्रभाग सामील आहे. तर दक्षिणेत पोलाची, तिरुप्पूर, डिंडीगुल, कोडाइकनाल, थेनी, श्रीविल्लिपुत्तूर, मेगामलाई, तिरुनेलवेली, कलक्कड, अम्बासमुद्रम आणि कन्याकुमारी सामील आहे.
हत्ती कॉरिडॉरमध्ये दीर्घकाळापासून स्थायिक लोकांच्या भूमीसंबंधी विचार केला जावा. या कॉरिडॉरचा वापर हत्तींच्या मुक्त संचारासाठी केला जाऊ शकतो असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने राज्य वन विभागाला निर्देश दिला होता.
हत्ती कॉरिडॉर केरळ तसेच कर्नाटकच्या वन प्रभागांमध्येही फैलावलेला आहे. तामिळनाडू वन विभागाने हत्ती कॉरिडॉरसंबंधी या दोन्ही राज्यांच्या वन विभागांना यापूर्वीच कळविले आहे. मानवी वस्तीपर्यंत पोहोचणाऱया रानटी हत्तींची तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या वन विभागांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे.









