कला व सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक अशोक परोब : 12 व्या रणमाले महोत्सवाचे पर्यावरणपूरक वातावरणात उद्घाटन
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या बारा वर्षांपासून सत्तरी तालुक्मयामध्ये रणमाले महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे बंद असलेली सत्तरी तालुक्मयातील ही कला अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. ही कला पुनर्जीवित करण्यासाठी ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्थेचे महत्त्वाचे योगदान आहे. यासाठी गोवा कला व सांस्कृतिक खात्याने या संस्थेला सातत्याने आर्थिक पाठबळ देऊन ही कला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. येणाऱया काळातही अशा पारंपरिक कला अदृश्य होणार नाहीत, याची विशेष दखल घेतली जाईल, असे आश्वासन गोवा कला आणि सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक अशोक परब यांनी केले आहे.
चरावणे सत्तरी येथे पर्यावरणीय वातावरणात आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते रणमाले महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री सातेरी केळबाई यांच्या प्रांगणात खास सभा मंडपाचे उभारणी करण्यात आली होती. पूर्णपणे पर्यावरण पूरक देखावा यामध्ये हा महोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अशोक परब यांनी सांगितले की, रणमाले हा गोव्यातील विशेषतः सत्तरीतील विशिष्ट पारंपरिक कलाप्रकार आहे. ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी या ग्रामीण भागातील जनतेने रणमालाची कला सातत्याने जपली. आज आपल्यापुढे मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाल्यामुळे याकलेकडे दुर्लक्ष होऊ लागलेली आहे. तरीसुद्धा पारंपरिक कलेचे संवर्धन करण्यासाठी ज्ये÷ कलाकारांनी आतापर्यंत चांगले योगदान दिले आहे. या कलेच्या विकासासाठी ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्थेने 12 वर्षांपासून या रणमाले महोत्सवाचे सातत्याने आयोजन करण्यावर भर दिलेला आहे. यामुळे तत्तरी तालुक्मयातील अनेक गावांमध्ये बंद असलेली कला पुन्हा एकदा जिवंत झाली.
स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी यावेळी बोलताना गोवा ही कलाकारांची खाण आहे. पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी प्रतापसिंह राणे यांनीसुद्धा महत्त्वाचे योगदान दिले आहे. आता रणमाले महोत्सवाच्या माध्यमातून ही पारंपरिक कला पुन्हा एकदा नव्या दमात आपल्यासमोर येत आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, असे आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या. गोवा कला व सांस्कृतिक खात्याने पारंपरिक कला संवर्धित करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलेले आहे. यामुळे येणाऱया काळात या कला पुन्हा एकदा तरुणांना एक वेगळाच प्रकारचा आदर्श निर्माण करून देईल अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सत्तरी तालुक्मयात रवींद्र भवन उभारून या तालुक्मयातील कलाकारांना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सरपंच सरिता गावकर ,स्थानिक पंच विनायक गावस यांनी यावेळी आपले विचार मांडले. सुरुवातीला गावातील महिला भगिनींनी सादर केलेल्या सुंदर स्वागत गीताने या महोत्सवाच्या सुरुवात करण्यात आली. पारंपारिक समई प्रज्वलित करून महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पारंपरिक व पुरातन वस्तूच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामीण कला आणि संस्कृती संस्थेचे अध्यक्ष अंकुश धुरी यांनी केले. स्वर्गीय रामा धुरी यांच्या नावाने हा महोत्सव दरवषी साजरा होतो. ग्रामीण जनता रणमालेच्या पारंपरिक कलेवर अतूट प्रेम करीत असल्याचे सिद्ध होत आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्याध्यक्ष अभिषेक गावस, सचिव प्रकाश गावकर देवस्थान पुजारी अर्जुन गावस, पुजारी गोपाळ गावस यांची उपस्थिती होती.
समितीचे कार्याध्यक्ष अभिषेक गावास यांनी स्वागत केले यावेळी त्यांनी गावातील सर्व नागरिकांनी एकजुटीने हा रणमान्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व अभिनंदन केले.
ग्रामीण कला आणि संस्कृती संस्था यांच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे सहकार्य करणारे संस्थापक सदस्य कृष्णा गावस व आत्माराम गावस यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नाईक यांनी केले.