कोलंबियात काही महिन्यांपूर्वी आकाशात उडणारा एक रहस्यमय गोळा दिसून आला होता, ज्यानंतर तो जमिनीवर उतरविण्यात आला होता आणि याच्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. हा गोळा एखाद्या युएफओशी संबंधित असल्याचा अनुमान काही लोक लावत आहेत.
सोशल मीडियावर देखील या ऑब्जेक्टच्या उडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या विचित्र गोळ्याला मार्च महिन्यात देशाच्या बुगा शहराच्या वर उडताना चित्रित करण्यात आले होते. यानंतर तो जमिनीवर कोसळला होता. या गोळ्याचे वजन सुमारे 4.5 पाउंड आहे. यावर अनेक प्राचीन दिसणारी चिन्हं आहेत, ज्यात अक्षरं देखील सामील आहेत.
ही वस्तू एखाद्या एलियनचे यान किंवा युएफओमधून कोसळल्याचा स्थानिक लोकांचा दावा आहे. तर काही संशोधक देखील असेच मानत आहेत. कारण ही वस्तू नेमकी कुठून आली हे त्यांना सांगता येत नाही. गोळ्याची तपासणी करणारे रेडिओलॉजिस्ट डॉ. जोस लुइस वेलास्केज यांच्यानुसार गोळ्यात कुठेच वेल्ड किंवा जोड नाही, जो सर्वसाधारणपणे मनुष्यांद्वारे निर्मित करण्यात आल्याचे संकेत देत असतो.
अधिक परीक्षणाची गरज
हे कृत्रिम वाटते आणि यात वेल्डिंगचा कुठलाही पुरावा दिसून येत नाही. तसेच याची अंतर्गत संरचना उच्च घनत्वयुक्त घटकांनी निर्माण झालेली आहे. याच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आणखी अधिक परीक्षणांची आवश्यक असल्याचे डॉ. वेलाजक्वेज यांनी म्हटले आहे.
गोळ्यावर अनेक प्राचीन संकेत
वैज्ञानिकांनी एआयचा वापर करत गोळ्यावरील प्रतिकांचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला, ज्यात एक संदेश लिहिलेला होता, परिवर्तनाच्या चक्रात मिलन आणि ऊर्जेच्या माध्यमातू जन्माची उत्पत्ति, एकता, विस्तार आणि चेतनेचा मिलनबिंदू असे यात नमूद होते.
गोळ्याच्या आत अनेक फायबर ऑप्टिक्स
तर मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांच्या एका पथकाने या बुगा स्फीयर नावाच्या अज्ञात गोळ्याचे सुक्ष्म स्कॅन केले आणि यात फायबर ऑप्टिक तारांचे जाळे असल्याचे समोर आणले. यातून हा संकेत पाठवू आणि प्राप्त करू शकतो हे कळले. हा गोळा ज्या शेतात कोसळला होता, तेथे अचानक पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे तेथील सर्व गवत आणि माती नष्ट झाली. हे बहुधा किरणोत्सर्ग नव्हते, तर एकप्रकारची अदृश्य ऊर्जा होती, ज्याने गवत अन् मातीतून सर्व पाणी शोषून घेतल्याचे मेक्सिकोच्या राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
गोळ्याला स्पर्श केल्यावर आजारी
या वस्तूला पारंपरिक विमानाच्या वेगाच्या उलट आकाशात वेगाने उडताना पाहले गेले आहे. ज्या व्यक्तीला हा गोळा मिळाला होता, त्याचे नाव जोस होते, या गोळ्याला स्पर्श केल्यावर अनेक दिवसापर्यंत तो आजारी होता अशी माहिती संशोधन पथकाचे सदस्य डेव्हिड वेलज एल पोत्रो यांनी सांगितले.









