नवी दिल्ली :
आम आदमी पक्षाचे आमदार आणि प्रमुख मुस्लीम नेते अब्दुल रहमान यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी आम आदमी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विचारांमध्ये अंतर वाढल्याचे सांगत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष आणि समर्थक माझ्या या निर्णयाला समजून घेतील अशी अपेक्षा असल्याचे अब्दुल रहमान यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.









