सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात तुम्हाला कोणती गोष्ट कधी दिसून येईल याचा विचारही करता येत नाही. अनेकदा तर अशा गोष्टी दिसून येतात, ज्या कल्पनेपलिकडील असतात. आम्ही जगाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाविषयी जाणून घेऊ शकतो. लोक स्वत:च्या क्रिएटिव्हिटीला देखील जगासमोर काही मिनिटांमध्ये सादर करत असतात.
एक असाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात लोकांना बाहेरून एक छोटी गाडी दिसून येत आहे, या गाडीत कुणी सहजपणे बसणेही अवघड आहे. परंतु यातील दृश्य कुणालाही चकित करण्यासाठी पुरेसे होते. एमा मीज नावाच्या महिलेने सोशल मीडियावर ही गाडी दाखविली आहे. ही गाडी म्हणजे तिचे चालतेफिरते घर आहे.
ही गाडी अत्यंत छोटी दिसत असली तरीही याच्या आत कुणी राहत असेल अशी कल्पनाही करता येत नाही. परंतु एमाने एका पोलिश कंपनीची ही कारवां खरेदी करत स्वत:चे जग थाटले आहे. ही गाडी केवळ 4.5 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद आहे. याच्या आतील भाग पिवळ्या आणि नारिंगी रंगाने सजविण्यात आला आहे. ज्यात छोटासा सिंगल बेड आणि एक छोटा डबल बेड देखील आहे. याच्या दरम्यान छोटा फ्रिज, हॉब आणि सिंक देखील आहे. छोटा कबर्ड तसेच वॉर्डरोब देखील या गोष्टी साठविण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
एमाच्या या छोट्या घराला पाहून लोक कौतुक करत आहेत आणि आश्चर्यही व्यक्त करत आहेत. परंतु प्रत्येक जण अखेर बाथरुम आणि टॉयलेट कुठे आहे हा प्रश्न विचारत आहेत. एमाने या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. परंतु तिच्या या पोस्टला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या पूर्ण घराला तयार करण्यास तिला केवळ 3 लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे.









