शाहूवाडी प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीनजिक गुरुवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान एक मिनी व्हॅनिटी व्हॅन जळून खाक झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, कागलहून गणपतीपुळे कडे जाणाऱ्या या मिनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सात प्रवासी होते . गुरुवार पहाटे साडेचार वाजता ड्रायव्हर सीटच्या पाठी मागील बाजूस शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी मलकापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे श्री वारकरी, शाहिद मेस्त्री , व गणेश पांढरबळे यांनी आग आटोक्यात आणली . या घटनेची फिर्याद भिकाजी सदाशिव पाटील राहणार मौजे सांगाव ता.कागल यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली .









