श्रीम. कुंदा यशवंत बर्डे रा-सातोसे ही वृद्ध महिला काल रात्री एसटी बस स्टँड सावंतवाडी येथे फिट येऊन पडली होती . तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. व रक्त वाहत होतं . त्यावेळी कलंबिस्त येथील कांचन बाळकृष्ण कदम हिने तिला उचलून डोक्याला रुमाल बांधला व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ शेखर सुभेदार यांना कॉल करून याची कल्पना दिली असता त्या ठिकाणी लगेचच सामाजिक बांधिलकीचे सदस्य शेखर सुभेदार, प्रवीण पटेकर व नाना देसाई बसस्थानक जवळ पोहोचले . सदर वृद्ध महिलेच्या डोक्यातून रक्त वाहत होते त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला व चहा पाणी देऊन त्या वृद्ध महिलेला काही काळ त्याच ठिकाणी शांत बसवले. त्यावेळी तिथेच सावंतवाडी पोलीस डूमिंग डिसोजा होते. त्यांनी लगेचच पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देऊन पोलिसांची गाडी मागवली व बांदा पोलीस ठाण्यातून माजी सरपंच सातोसकर यांच्याशी संपर्क केला. त्या महिलेला कॉन्स्टेबल पी. बी.नाईक व सुभाष नाईक, पोलीस डुमिंग डिसोजा व शेखर सुभेदार यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले व प्राथमिक उपचारानंतर नंतर सदर वृद्ध महिलेला महिला कॉन्स्टेबल पी.बी .नाईक, सुभाष नाईक व सामाजिक बांधिलकीचे शेखर सुभेदार यांनी रात्री 10 वा सातोसे येथे माजी सरपंच सातोस्कर यांच्याशी संपर्क करून घरी सातोसे या ठिकाणी जाऊन त्या वृद्ध महिलेला नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









