सध्या घर खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. परंतु काही लोकांनी घरासाठी असे पर्याय शोधले आहेत, जे ऐकून कुणीही चकित होऊ शकतो. अनेक लोक घराऐवजी कॅराव्हॅनमध्ये राहू लागले आहेत. इंग्लंडमधील एका व्यक्तीने देखील असेच केले आहे. या इसमाने एका ट्रकलाच स्वत:चे घर केले आहे. आता तो या पर्यायाद्वारे दरवर्षी लाखो रुपयांची बचत करत आहे. त्याचे घर बाहेरून साधे वाटते, परंतु आतून तो पूर्ण महालच आहे.
दक्षिण इंग्लंडचा रहिवासी सॅम एक फायरफायटर आहे. त्याला घराचा खर्च अधिक वाटत होता, यामुळे त्याने एक लॉरी खरेदी केली आणि याला स्वत:च्या गरजांनुसार रुपातंरित केले आणि आता तो याच ट्रकमध्ये राहतो. ट्रक खरेदी करत त्याला घरात रुपांतरित करण्यासाठी त्याला सुमारे 71 लाख रुपयांचा खर्च आला आहे.
सर्वात मोठा खर्च ट्रकच्या इंधनाचा आहे, याशिवाय तो अत्यंत कमी रक्कम ट्रक किंवा स्वत:वर खर्च करतो. यातून तो वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत करत आहे. ट्रकसाठी 156 रुपये प्रतिलिटरच्या हिशेबाने इंधन लागते. ट्रकमध्ये कमी प्रमाणात इंधन भरत असल्याने माझ्या खर्चाची बचत होते. अनेक लोकांना ट्रक घर असू शकत नाही असे वाटते, परंतु जेथे शांतता आणि आरामदायी अनुभव येतो ते ठिकाण घर असू शकते, असे माझे मानणे असल्याचे सॅमचे सांगणे आहे.
ट्रक विकण्याची तयारी
घरात त्याने आधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. किंग साइज बेड, बाथरुम, किचन त्यात असून मुलांसाठी बंक बेड देखील आहेत. परंतु काही वर्षांमध्ये तो हा ट्रक विकणार आहे. परंतु सध्या तो वेगवेगळ्या देशांच्या प्रवासावर ट्रकद्वारेच निघणार आहे.









