ओटावा :
कॅनडाच्या संघीय न्यायालयाने भारतीय नागरिक कंवलजीत कौरचा आश्रयाचा अर्ज फेटाळला आहे. खलिस्तान आंदोलनाची समर्थक आणि शीख फॉर जस्टिसशी असलेल्या संबंधांमुळे भारतात परतल्यास माझा छळ होईल, यामुळे कॅनडातच वास्तव्य करण्याची अनुमती दिली जावी असा दावा कंवलजीतने स्वत:च्या अर्जात केला होता. शीख फॉर जस्टिस ही प्रतिबंधित संघटना असून ती दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूकडून चालविली जाते. पन्नू सातत्याने भारताच्या विरोधात विष ओकत असतो. शीख फॉर जस्टिसशी संबंधित असल्याने छळ होण्याचा धोका असल्याचा कंवलजीतचा दावा न्यायाधीश गोय रेजिमबाल्ड यांनी फेटाळला. पंजाबमधील रहिवासी कौर फेब्रुवारी 2018 मध्ये कॅनडात पोहोचली होती. एक वर्षाच्या कालावधीनंतर सप्टेंबर 2019 मध्ये कौरने शरणार्थी संरक्षणाची मागणी केली होती.









