वृत्तसंस्था / चेन्नई
2024 च्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेला येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत चेन्नई लाईन्स आणि दबंग दिल्ली या संघांचे नेतृत्व करणारे अनुक्रमे अचंता शरथ कमल आणि जी. साथीयान यांच्यातच प्रमुख लढत अपेक्षित आहे.
या स्पर्धेमध्ये यु मुंबा संघाचे नेतृत्व मानव ठक्कर करत असून त्यांचा सलामीचा सामना जयपूर पेट्रीऑटस् बरोबर होणार आहे. पाचव्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच जयपूर पेट्रीऑटस्चा सहभाग होत आहे. मात्र चेन्नई लायन्स आणि दबंग दिल्ली या दोन संघांमध्ये देशातील अव्वल स्पर्धकांचा समावेश असल्याने त्यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चेन्नई लायन्स संघामध्ये शरथ कमल, जपानचा सेकुरा मोरी, फ्रान्सच्या जुलेस रोलॅन्ड, पी. वैश्य, मौमादास यांचा समावेश आहे. दबंग दिल्लीमध्ये जी साथीयान, थायलंडचे पेरांग, दिया चितळे, ऑस्ट्रियाचा लेव्हेंको, मलिक, लक्षीता नारंग यांचा सहभाग आहे. यु. मुंबामध्ये मानव ठक्कर, सुतीर्थ मुखर्जी, नागेरियाची अरुणा कद्री, आकाश पाल, के. भास्कर आणि स्पेनची मारिया झियाओ यांचा सहभाग राहिल.









