मानवी उत्पत्तिपासून त्याच्या राहणीमानाच्या पद्धतींबद्दल अद्याप ठोस माहिती मिळविता आलेली नाही. परंतु अलिकडेच वैज्ञानिकांच्या हाती अशी वस्तू लागली आहे, ज्याने मानवी इतिहासाबद्दलचे नवे वास्तव समोर आणले आहे. याच्या मदतीने मानवी इतिहासाचा नवा पैलू समोर आला आहे. वैज्ञानिकांना एक सांगाडा मिळाला असून तो सुमारे 29 हजार वर्षे जुना आहे.
थायलंडच्या खाओ सॅम रोई यॉट नॅशनल पार्कमध्ये वैज्ञानिकांना एका मुलाचा प्राचीन सांगाडा मिळाला आहे. हा सांगाडा 29 हजार वर्षे जुना आहे. या भागात यापूर्वीही अनेक प्राचीन गोष्टी मिळाल्या आहेत. फाइन आर्ट्स डिपार्टमेंटने याविषयी अधिक माहिती मिळाली आहे.
थायलंडच्या डिन नावाच्या गुहेत उत्खनन सुरू असताना हा सांगाडा मिळाला आहे. या सांगाड्याला जगातील सर्वात जुना सांगाडा ठरविले जात असून याच्या मदतीने मानवी इतिहासाचे पुनर्लेखन केले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
थायलंडच्या गुहेत मिळाला सांगाडा
या शोधाच्या मदतीने थायलंडमध्ये मानवी इतिहासाविषयी अधिक माहिती प्राप्त होऊ शकेल. फाइन आर्ट्स डिपार्टमेंटच्या महासंचालकांनी हा अत्यंत अनोखा शोध आहे आणि याच्या मदतीने दक्षिणपूर्व आशियाच्या प्राचीन मानवांविषयी खूप काही जाणता येणार असल्याचे म्हटले आहे. येथे सांगाड्यासोबत अनेक प्राचीन वस्तू मिळाल्या असून त्याच्या मदतीने प्राचीन काळातील लोकांच्या राहणीमानाविषयी अधिक माहिती हाती लागणार आहे.
6-8 वयोगटातील मुलाचा सांगाडा
सांगाड्याला दगडांदरम्यान अत्यंत खबरदारीपूवंक दफन करण्यात आले हेते. यातून दफन करण्याची पूर्ण प्रक्रिया किती काळजीपूर्वक केली जात असावी हे कळते. दफन करण्यापूर्वी शरीराला बांधण्यात आले होते. मृतदेहाला सुपाइन स्थितीत ठेवण्यात आले होते, म्हणजेच पाठीच्या बळावर थेट सरळ झोपविण्यात आले असावे. मृतदेहाचे शीर दक्षिणपूर्व दिशेत होते, यातून त्याच्या मान्यतांचा हा हिस्सा राहिला असावा असे समजते. मृत्यूपूर्वी मुलाचे वय 6-8 वर्षांदरम्यान राहिले असावे. माती आणि जीवाश्माच्या विश्लेषणातून सांगाडा 29 हजार वर्षे जुना असल्याचे कळले आहे.









