लक्झरी फॅशनचे जग अत्यंत मोठे असून या लाइफस्टाइलमध्ये शिरकाव करणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. अत्यंत धनाढ्या लोकच अशाप्रकारच्या राहणीमानाचा आनंद घेऊ शकतात. अलिकडेच युएस आर्टिस्ट कलेक्टिव्ह एमएससीएचएफने एक असामान्य गोष्ट निर्माण केली आहे. एमएससीएचएफकडून लिलाव केली जाणारी बॅग इतकी छोटी आहे की ती सुईच्या छिद्रातही सामावू शकते. एक सुक्ष्म लुई विता बॅग आश्चर्यकारक स्वरुपात मिठाच्या दाण्यापेक्षाही लहान आहे. या बॅगने सर्व नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

ही बॅग केवळ मायक्रोस्कोपद्वारे पाहिली जाऊ शकते. या बॅगेसोबत एक मायक्रोस्कोप देण्यात येत आहे. ही बॅग लुई वुइटनची कॉपी आहे. एमएससीएचएफने इन्स्टाग्रामवर याचे एक छायाचित्र शेअरे केले आहे. मोठी हँडबॅग, सामान्य हँडबॅग आणि छोटी हँडवॅग आहे, परंतु बॅगच्या लघुकरणात हा अंतिम शब्द आहे असे एमएससीएचएफने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद पेले आहे. ही बॅग बोटावर ठेवल्यावर देखील सहजपणे दिसून येत नाही. ही पोस्ट सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय ठरली असून युजर्स यावर कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत. जर मी खरोखरच श्रीमंत असतो, तर ही बॅग खरेदी करून तिला एका ग्लास कॅबिनेटखाली ठेवून दिलो असतो अशी टिप्पणी एका युजरने केली आहे.









