युवतीने करविल्या अनेक शस्त्रक्रिया
इटलीच्या रोममध्ये राहणाऱ्या एका युवतीने स्वत:च्या शरीरात इतके बदल करवून घेतले आहेत की आता माणूस कमी आणि मांजर अधिक वाटत आहे. तिने 20 बॉडी मॉडिफिकेशन करविले असून तिचे नाव कियारा डेल एबेट आहे. मांजरासारखे दिसण्याचे तिचे स्वप्न होते. याचमुळे तिने स्वत:मध्ये अशाप्रकारे बदल केले आहेत. तिने टिकटॉकवर स्वत:चे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओंना अनेक दशलक्ष लोकांनी पाहिले आहे, मी माझ्या घरात एकदम ठीम आहे.

तसेच या लाइफस्टाइलमुळे मला कुठलीच समस्या नाही. मी एक अत्यंत चांगली कॅट लेडी आहे. वयाच्या 11 व्या वर्षापासूनच मी स्वत:मध्ये बदल करविण्यास सुरुवात केली होती. तेव्हा पहिल्यांदा पियरसिंग आणि इयर स्टेचिंग करविले होते, असे 22 वर्षीय कियाराचे सांगणे आहे. पुढील 5 वर्षांमध्ये तिने स्वत:च्या शरीरात 72 वेळा पियरसिंग करविले आहे. कियाराने स्वत:च्या जीभेचे देखील दोन हिस्से करविले आहेत. तर डोक्यावर शिंग देखील तयार करविले आहे. याचबरोबर डोक्यावर आणि नाकावरही देखील अनेक पियरसिंग आहेत. टिकटॉकवर तिच्या एका व्हिडिओला 65 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे. कियाराने स्वत:च्या पापण्यांखालील एक्स्ट्रा फॅट काढून टाकण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करविली आहे. तिने स्वत:च्या दोन्ही डोळ्यांमध्sय टॅटू काढून घेतले आहे.
ती एका मानव रुपातील मांजर होण्याची इच्छा बाळगून आहे. मानवी शरीर किती बदलू शकते आणि तुम्ही शारीरिक बदलांद्वारे काय प्राप्त करू शकता हे पाहणे वेडेपणा आहे. कॅट लेडी होणे माझ्यासाठी अधिक योग्य आहे कारण मी प्रत्यक्षात एका कार्टून कॅरेक्टरप्रमाणे दिसू इच्छित नसल्याचे कियारा सांगते.
मांजर मला नेहमीच पसंत राहिले आहे. योग्य शारीरिक बदलांसोबत एक कॅट लेडी होण्याइतकी मी साहसी आहे. पूर्णपणे मांजरासारखे दिसण्यासाठी मला कॅट आय लिफ्ट किंवा कँथोप्लास्टी करविण्याची गरज भासणार आहे. अधिक लांब आणि नैसर्गिक स्वरुपात बदामाच्या आकाराचे डोळे मिळविण्यासाठी शस्त्रक्रिया, दातांना पुन्हा आकार देणे, वरच्या ओठाला विभाजित करणे आणि अधिक फीलर्सची आवश्यकता असल्याचे कियाराने म्हटले आहे.









