उत्रे/ प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील डोंगर परिसरात दहा ते बारा रानडुक्कराच्या कळपाने हातातोंडाशी आलेला ऊस फस्त करून नुकसान केले आहे. सुमारे दहा एकरातील ऊसाचे डुक्कराच्या कळपाने नुकसान केले आहे. वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती .तरुण भारत ने या संदर्भात बातमी दिली. बातमीची दखल घेऊन वनरक्षक बाजीराव देसाई, वनमजूर रघुनाथ पाटील यांनी पाहणी केली.
उत्रे निकमवाडी दरम्यान डोंगर परिसरातील वांजुळ माळ- दरा नावाच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून दहा ते बारा रान डुक्कराचा कळपाचा वावर आहे.हा कळप रात्रीच्या वेळी या परिसरातील ऊस फस्त करत आहेत. डुक्करानी सुमारे दहा एकर क्षेत्रातील दहा ते बारा शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा नुकसानभरपाई मिळावी तसेच या डुक्करांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.तरुण भारत ने बातमी दिल्यामुळे कोतोली वनविभागाचे वनरक्षक बाजीराव देसाई, वनमजूर रघुनाथ पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली.नुकसानभरपाईचे व रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.









