वृत्तसंस्था / सिंगापूर
रविवारी येथे सिंगापूर ग्रा प्रि एफ-1 मोटार रेसिंग शर्यत आयोजित केली आहे. दरम्यान या शर्यतीपूर्वी शनिवारी पोल पोझीशन्ससाठी सरावाचे सत्र आयोजित केले होते. पण सरावाच्या मार्गावर प्रचंड आकाराचा सरडा (पाल) आढळल्याने स्पर्धकांना आपला सराव थांबवावा लागला.
सरावाच्या मार्गावरील सरडा निघून गेल्यानंतर पुन्हा स्पर्धकांनी सराव सुरू केला. या सराव सत्रामध्ये मॅक्लेरिन चालक नोरीस याने सर्वात जलद वेळ नोंदवित पोल पोझीशन पटकाविले. रेडबुल चालक र्व्हस्तेपण चौथ्या स्थानावर राहिला.









