कोल्हापूर :
पोटाची खळगी भरण्यासाठी काहीही करायला मानव जात तयार असते. ट्रॅफिक सिग्नल पडला की थांबलेल्या गाड्यांसमोर कसरती करून पोट भरण्याचा पर्याय या चिमुकलीसह कुटुंबियांनी शोधला आहे. परंतू एखादी गाडी वेगाने आली तर या चिमुकलीच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ट्रॉफिक पोलीसांसमोर कसरती करणाऱ्या या कुटुंबाला पोलीसांनी धाक दाखवण्याची गरज आहे. अन्य ठिकाणीही हे कुटुंब कसरती करून पोट भरू शकते.
देशातील अनेक भटक्या जमातीतील लोक पोटासाठी विविध काम करीत असतात. रस्त्याच्या कडेला दोरीवर उभा राहून कसरती करणाऱ्या लहान मुली पाहायला मिळतात. मोफत शिक्षण कायदा असूनही हे लोक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत. तर दोरीवर उभा राहून, लोखंडी सळईत उभारून कसरती करून पैसे मिळवण्याचे प्रशिक्षण मात्र देतात. ट्रॉफिक सिग्नला गाडी थांबली की या चिमुकलीचे नातेवाईट ढोलकी वाचवतात व चिमुकली गाड्यांसमोर कसरती करीत पैसे मागतात.
कोल्हापूर शहरातील पार्वती टॉकीट येथील सिग्नलसह अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. येथे ट्रॉफिक पोलीस असतात, परंतू या कुटुंबियांना रोखत नाहीत. एखाद्या गाडीने या चिमुकलीला उडवल्यास याला कोण जबाबदार, असा प्रश्नही वाहनधारकांकडून विचारला जातो. सिग्नलला उभा असलेल्यांपैकी दोन टक्के लोक या मुलीला आर्थिक मदत करतात. परंतू इतर वाहनधारक त्यांना धुडकावून लावतात. तरीही जीववार बेतणारा हा अटापिटा पोट भरण्यासाठी केला जातो. पसे मिळवण्यासाठी या कुटुंबियांना काम करण्याचा आणि आपल्या मुला-मुलींना सांभाळण्याचा मार्ग आहे. परंतू हे लोक याच लहान मुलांच्या जीववार दोनवेळचे जेवन करतात.
- महिला व बालकल्याण विभाग गेला कोठे
सिग्नलवर कसरती करीत पैसे मागणारे हे कुटुंब खाण्याच्या वस्तू स्वीकारत नाही. तर चिमुकल्यांना कसरती करायला लावून कुटुंबातील पुरूष नशा करतो. त्यामुळे जीववार बेतणारे काम करूनही अनेकदा या मुलांना उपाशापोटी झोपावे लागते. याकडे महिला व बालकल्याण विभाग कधी लक्ष देणार याकडे अनेक प्रवाशांचे लक्ष लागले आहे. ऐरवी आम्ही मुलांचे पुनर्वसन केले म्हणून सांगणारे महिला व बालकल्याण विभाग आता कोठे गेला आहे.
- ट्रॅफिक पोलीस कामात व्यस्त
पार्वती टॉकीज येथे टॅॅफिक पोलीस असतात. परंतू सिग्नलला थांबलेल्या गाड्यांसमोर कसरत करणाऱ्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करतात. तर अठरा वर्षाखालील मुल, ड्रायव्हिंग लायसन नसणाऱ्यांचे चलन कापण्यात ट्रॉफिक पोलीस व्यस्त असतात.








