एकूण 76 उमेदवारी अर्ज दाखल : शक्तिप्रदर्शनाने काही जणांनी भरला अर्ज
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मंगळवारी 76 अर्ज दाखल झाले आहेत. काही जणांनी 3 ते 4 वेळा अर्ज दाखल केले आहेत. शक्तिप्रदर्शन करत काही जणांनी आपले अर्ज दाखल केले तर काहींनी केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. गुऊवार दि. 20 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून दोन दिवसांत आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारी निपाणी मतदारसंघातून 6 अर्ज दाखल झाले. चिकोडी-सदलगा 6, अथणी 5, कुडची 2, रायबाग 3, हुक्केरी 12, अरभावी 3, गोकाक 8, बेळगाव उत्तर 3, बेळगाव दक्षिण 4, बेळगाव ग्रामीण 4, खानापूर 4, कित्तूर 2, बैलहोंगल 5, सौंदत्ती 5, रामदुर्ग 4 असे एकूण 76 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वात जास्त हुक्केरी मतदारसंघामध्ये अर्ज दाखल झाले आहेत.
निपाणी मतदारसंघातून जेडीएसतर्फे राजाराम ऊर्फ राजू मारुती पवार, आम आदमी पार्टीतर्फे राजेश आण्णासाहेब बनवन्ना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उत्तम रावसाहेब पाटील, अपक्ष म्हणून संभाजी बापुसो थोरवत, आम आदमी पार्टीतर्फे पद्मा राजेश बनवन्ना यांनी अर्ज दाखल केले आहेत. चिकोडी मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्यावतीने श्रीकांत मगदूम पाटील, कर्नाटक रयत संघातर्फे मंजुनाथ बाळू परगोंड, भाजपतर्फे रमेश विश्वनाथ कत्ती, लावा रमेश कत्ती, अपक्ष म्हणून स्वप्नील गणेश हुक्केरी यांनी अर्ज दाखल केले आहेत. अथणी मतदारसंघातून अपक्ष म्हणून जोतिबा भाऊ जाधव, काँग्रेसतर्फे लक्ष्मण सवदी, जनता दल (सेक्युलर) शशिकांत सिद्धाप्पा पडसलगी, उत्तम प्रजाकीय पार्टी भरतेश भुजंगबली कुद्री, कुडची मतदारसंघातून भाजपतर्फे आर. श्वेता, कल्याण राज्य प्रगती प्रकाश पार्टीतर्फे श्रीशैल हणमंत बजंत्री, रायबाग मतदारसंघातून अपक्ष म्हणून शंभू कृष्णा कल्लोळीकर, भाजपतर्फे दुर्योधन ऐहोळे आणि अरुण दुर्योधन ऐहोळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
हुक्केरी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे ए. बी. पाटील, विनया अप्पय्यगौडा पाटील, भाजपतर्फे निखिल उमेश कत्ती आणि कुश रमेश कत्ती यांनी अर्ज दाखल केले आहेत. अरभावी मतदारसंघातून अपक्ष म्हणून अशोक पांडाप्पा हंजी, स्वयंम कृषी पार्टीतर्फे गुळाप्पा बसलिंगाप्पा मेटी यांनी अर्ज दाखल केले आहेत. गोकाक मतदारसंघातून आम आदमी पार्टीतर्फे जोन्सकुमार मारुती कऱ्याप्पगोळ, काँग्रेसतर्फे महांतेश कल्लाप्पा कडाडी, बहुजन समाज पार्टीतर्फे लोहीत चंद्राप्पा भागण्णावर, भाजपतर्फे रमेश लक्ष्मण जारकीहोळी आणि अमरनाथ रमेश जारकीहोळी तर अपक्ष म्हणून प्रकाश महादेव भागोजी यांनी अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघातून म. ए. समितीच्यावतीने अॅड. अमर किसन येळ्ळूरकर, आम आदमी पार्टीतर्फे राजकुमार महादेव टोप्पण्णावर, कल्याण राज्य प्रगती पक्षातर्फे प्रवीण बसवराज हिरेमठ, बेळगाव दक्षिण मतदारसंघातून म. ए. समितीच्यावतीने रमाकांत जयवंत कोंडुस्कर, अपक्ष म्हणून भारत बाळाप्पा गोटी, कर्नाटक राष्ट्र समितीतर्फे हणमंत मल्लप्पार यांनी अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लक्ष्मी रविंद्र हेब्बाळकर, खानापूर मतदारसंघातून भाजपतर्फे विठ्ठल सोमान्ना हलगेकर, काँग्रेसतर्फे अंजली हेमंत निंबाळकर तर अपक्ष म्हणून सुरेश विठ्ठलराव देसाई यांनी अर्ज दाखल केले आहेत.
कित्तूर मतदारसंघातून कर्नाटक राष्ट्र समितीतर्फे महेश फकिराप्पा होसमनी, आम आदमी पार्टीतर्फे आनंद ईराप्पा हंप्पण्णावर यांनी अर्ज दाखल केले आहेत. बैलहोंगल मतदारसंघातून भाजपतर्फे जगदीश ऊर्फ विरुपाक्ष चन्नाप्पा मेटगुड, उत्तम प्रजाकीय पार्टीतर्फे रुद्राप्पा चंद्रशेखर माळगी, अपक्ष म्हणून विश्वनाथ इरणगौडा पाटील, इंडियन मोव्हमेंट पार्टीतर्फे दयानंद गुरु पुत्रय्या चिकमठ यांनी अर्ज दाखल केले. सौंदत्ती मतदारसंघातून कर्नाटक राष्ट्रीय समितीतर्फे पराप्पा शंकऱ्याप्पा अनंतक्कण्णावर, अपक्ष म्हणून आनंद इरय्या कांतीमठ, आम आदमी पार्टीतर्फे बापुगौडा सदानंदगौडा पाटील, जनता दलातर्फे सौरव अनंतकुमार चोप्रा, भाजपतर्फे रत्ना विश्वनाथ मामनी, रामदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे अशोक महादेवाप्पा पट्टण, भाजपतर्फे रिनाप्पा फकिराप्पा सोमगेंड, आम आदमी पार्टीतर्फे मलिकजान हुसेनसाब नदाफ यांनी अर्ज दाखल केले आहेत.









