चौके/वार्ताहर
मालवण तालुक्यातील साळेल येथील वस्तीतून वाहणार्या नाल्यामध्ये भलीमोठी मगर आठळून आली.शनिवार रात्रौ 9-30 वाजता खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या प्रकाश घाडी आणि अन्य दोघांनाही भलीमोठी मगर त्यांच्या दृष्टीस पडली.त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थांना कल्पना दिली.भरवस्तीत आढळून आलेल्या मगरीमुळे साळेल गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.कारण साळेल गावातील ग्रामस्थ या नाल्यातील पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी,शेतीसाठी,गुरासाठी करतात.या वाहणार्या नाल्यावरती गावातील शेतकऱ्यांचा वावर असतो.त्यामुळे गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्यांना ही मगर दृष्टीस पडली त्यांनी गावातील ग्रामस्थांना कल्पना दिल्या नंतर सरपंच रवींद्र साळकर,रोशन गावडे, प्रशांत मीठबावकर,चिन्मय तावडे,आंबा घाडी,मंगेश जामदार,नंदू गावडे,संजय गावडे,साबाजी गावडे,लवकेश साळकर,प्रमोद जामदार,प्रकाश गावडे,गणेश गावडे,बांबू घाडी,कमलेश साळकर,निलेश गावडे व अन्य ग्रामस्थानी ही मगर प्रशांत मीठबांवकर यांच्या नेतुत्वाखाली जीव धोक्यात घालून या मगरीला पकडून वनरक्षक श्री.कांबळे याच्या ताब्यात दिली.
बर वस्तीतून वाहणार्या या नाल्यावरती मगर आली कशी याबाबत भीतीयुक्त चर्चा चालू आहे.अन्य भागात सापडून आलेल्या मगरी वनअधिकारी योग्य ठिकाणी सोडत नाहीत.एका गावात मिळाली कि ती दुसर्या गावामध्ये जंगलामध्ये सोडून मोकळे होतात.त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा आढळून येतात.जर त्यांचा योग्य बंदोबस्त केल्यास पुन्हा पुन्हा दिसून येणार नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .