दमास्कस चाकूचा मोठा चाहतावर्ग
कुठल्याही गोष्टीची किंमत त्यांच्या वैशिष्टय़ांवर अवलंबून असते. काहीसा असाच प्रकार चाकूबाबत देखील आहे. एकप्रकारचा चाकू लाखो रुपयांमध्ये विकला जातो. दमास्कस चाकू जर्मनीत मिळतो, या चाकूच्या निर्मितीमागे एक परंपरा असल्याने तो लोक लोकांना मोठय़ा प्रमाणात आकर्षित करत असतो.
चाकूनिर्मितीची ही शतकांपेक्षा जुनी कला आजही जिवंत आहे. या चाकूच्या निर्मितीची पद्धत अत्यंत वेगळी आहे. चाकू जितक्या अधिक गुणवत्तेचा असेल तितकीच त्याची किंमत अधिक असणार आहे. हा चाकू 5 हजार डॉलर्सपेक्षा (सुमारे 4 लाख रुपये) अधिक दरात विकत घ्यावा लागतो.

दमास्कस चाकूच्या निर्मितीला जगातील सर्वात जुन्या पेशांपैकी एक मानले जाते. या चाकूच्या निर्मितीवेळी काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास हा चाकू अनेक पिढय़ांपर्यंत टिकू शकतो. हा चाकू तयार करण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लगतो. याकरता अनेक वैशिष्टय़े असलेल्या खिळय़ांना एकत्र ठेवले जाते. या खिळय़ांना 1200 अंश सेल्सिअस तापमानावर आकार दिला जातो आणि प्रत्येक टप्प्यात हे आच्छादन दुप्पट होते, ज्यामुळे स्टील अधिक दणकट होते. चाकूची गुणवत्ता 360 आच्छादनांवर ठरत असल्याचे बोलले जाते.
हजारो वर्षे जुने तंत्रज्ञान
दमास्कस चाकू तयार करण्याचे तंत्रज्ञान हजारो वर्षे जुने आहे. या चाकूचा वापर मध्यकाळातही होत होता. तर चाकूचे नाव सीरियाची राजधानी दमास्कसवर आधारित आहे. दमास्कस हे 14 वया शतकात शस्त्रs अन् चाकूंच्या व्यापाराचे मुख्य केंद्र हेते. चाकूला आकार देण्यात आल्यावर त्याला तेलात बुडवून मजबूत केले जाते, मग त्याल अंतिम आकार देत धार दिली जाते. चाकू पूर्णपणे तयार झाल्यावर तो ऍसिडमध्ये बुडविला जातो, वेगवेगळय़ा स्टीलवर याचा मोठा प्रभाव पडत असतो. यामुळे चाकूवर विशेष दमास्कस पॅटर्न दिसून येतो. हा चाकू लवचिक आणि टिकाऊ असतो. याच्या हँडल्सना अनेक कलाकार लाकडी, हाडं किंवा हस्तीदंताद्वारे तयार करतात. याकरता हत्तींची शिकार केली जात नाही, तर प्राचीन हत्तींच्या पूर्वीपासून उपलब्ध दंतांचा वापर केला जातो.









