कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी तर्फे ‘भारत गौरव‘ उपक्रमांतर्गत शिवप्रेमींना आणि इतिहासप्रेमींना अनोखी भेट देण्यात येत आहे. येत्या 9 जूनपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज सारखी ट्रेन‘ ही विशेष पर्यटक रेल्वे मुंबई सीएसएमटी येथून सुरू होत असून, ही यात्रा 5 दिवस आणि 6 रात्रींची असणार आहे.
या ऐतिहासिक ट्रेनमधून प्रवासी रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळा या शिवकालीन महत्वाच्या स्थळांना भेट देणार आहेत. यामध्ये पुण्यातील लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांचाही समावेश आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी हॉटेलमध्ये निवास, स्थानिक वाहतूक, मार्गदर्शक, प्रवेश शुल्क, प्रवास विमा, व भोजन अशा सर्व सुविधा पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत. ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, राज्य सरकार आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
- ट्रेनचे पॅकेज दर (प्रति व्यक्ती) :
इकॉनोमी: 13,155
कम्फर्ट: 19,840
सुपेरिअर: 27,365
एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दुसऱ्या प्रवाशासोबत रूम शेअर करावी लागेल.
- ऐतिहासिक ठिकाणे:
रायगड किल्ला : छत्रपतींचा राज्याभिषेक व मराठा साम्राज्याची राजधानी
लाल महाल, पुणे : महाराजांचे बालपण
कसबा गणपती : पुण्याचे ग्रामदैवत, जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची स्थापना
शिवसृष्टी : छत्रपतींच्या जीवनाचे दर्शन
शिवनेरी किल्ला : छत्रपतींचे जन्मस्थान
भीमाशंकर : ज्योतिर्लिंग मंदिर
प्रतापगड : अफझलखान वधाचे ऐतिहासिक ठिकाण
पन्हाळा : बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर
- टूरचे वेळापत्रक:
9 जून : मुंबई सीएसएमटी – रायगड – पुण
s10 जून : लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी
11 जून : शिवनेरी – भीमाशंकर – पुणे
12 जून : सातारा – प्रतापगड – कोल्हापूर
13 जून : कोल्हापूर – पन्हाळा – रात्री मुंबईकड
14 जून : पहाटे मुंबई सीएसएमटी येथे आगमन
- शिवरायांचा पराक्रम अनुभवण्याची विलक्षण संधी
शिवरायांचे बालपण, राज्यभिषेक आणि पराक्रम अनुभवण्याची ही एक विलक्षण संधी आहे. विशेषत: कोल्हापूर व पन्हाळा या आपल्याच परिसरातील स्थळांचा समावेश यामुळे हा अभिमानाचा विषय वाटतो. मी आणि माझे कुटुंबीय या यात्रेसाठी नेंदणी करणार आहोत
सुधाकर शिंदे नागरिक कोल्हापूर








