चितवन
नेपाळच्या चितवन जिल्ह्यात मंगळवारी त्रिशुली नदीत भारतीय नंबरप्लेट असलेली एक जीप मिळाली आहे. ही जीप रस्त्यावरून खोल दरीत असलेल्या नदीत कोसळली होती. या जीपमधील प्रवाशांविषयी अद्याप माहिती मिळू शकली नसल्याचे पोलीस अधिकारी श्रीराम भंडारी यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे डांग जिल्ह्यातील रस्ते दुघटनेत दोन भारतीय नागरिकांसमवेत कमीतकमी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.









