बेळगाव – मराठा समाजाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या मागणीसाठी कर्नाटक मराठा समाजाअंतर्गत आम्हाला 2A श्रेणी द्यावी, सध्या आम्ही 3B श्रेणीत येतो, यासाठी एक विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महापूजा करून या रॅलीचे महत्त्व व जनजागृती सुरू केली असून आगामी काळात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. आमचा मराठा समाज कर्नाटकात ६० ते ७० लाखांच्या आसपास असल्याने शिक्षण, व्यवसाय, स्टार्ट अप, सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नोकऱ्यांमध्ये आरक्षण या क्षेत्रात आमच्या समाजाचा विकास हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. तर आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी २० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता सुवर्ण विधान सौद बेळगाव समोर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी श्री.व्ही.एस.श्यामसुंदर गायकवाड, भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव व मराठा सामाज्याचे सयोजक श्री.किरण जाधव,श्री.बहुसाहेब जाधव,श्री.विनायक कदम,श्री.मनोहर कडोलकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








