आनंदनगर-वडगाव येथील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
शॉर्टसर्किटने आग लागून घराचे नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास आनंदनगर-वडगाव येथे घडली. या आगीमध्ये घरातील साहित्य, फर्निचर तसेच सोन्याचे दागिने असे एकूण 4 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कृष्णा तुकाराम व•sबैलकर (मूळचे गर्लगुंजी) हे सध्या आनंदनगर, तिसरा क्रॉस येथील सुनील अतवाडकर यांच्या घरी भाडोत्री राहतात. रविवारी सकाळी दुरुस्तीनिमित्त हेस्कॉमने वीजपुरवठा खंडित केला होता. रविवार असल्याने व•sबैलकर कुटुंबीय गावी गेले होते. सायंकाळनंतर घरी आल्यावर पाहिले असता घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले होते. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वीजपुरवठा सुरू होताच शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला.









