वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे राकसकोप येथील खाचू रामू मोरे यांचे घर कोसळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसात त्यांचे घर कोसळले आहे.या घरात त्यांनी आपली जनावरे बांधली होती. तसेच घरात कुटुंबातील सदस्यही होते. भिंत पडण्याचा आवाज आल्यामुळे घरातील सदस्य बाहेर पळून आले. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. घराचा अर्ध्याहून अधिक भाग पडला असल्यामुळे गोठय़ात बांधलेल्या जनावरांना दुखापत झाली आहे. सदर शेतकऱयाला सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









