हॉटेलमध्ये बुकिंगसाठी लोकांमध्ये चढाओढ
जेव्हा तुम्ही कधी बाहेर फिरण्यासाठी जात असाल, तेव्हा तेथे वास्तव्य करण्यासाठी हॉटेल किंवा गेस्ट हाउस अवश्य बुक करत असाल. अशा ठिकाणी वास्तव्यासह भोजन अन् आवश्यक सुरक्षा मिळते. परंतु जगात एक असे हॉटेल आहे, जेथे कुठलेच छत, भिंत तसेच इमारत नाही. या हॉटेलमध्ये पर्यटक खुल्या आकाशाखालील पलंगावर झोपतात.

खुल्या जागेतील हे विचित्र हॉटेल जगातील सर्वात सुंदर देश म्हणवून घेणाऱया स्वीत्झर्लंडमध्ये आहे. या हॉटेलचे नाव नल स्टर्न आहे. पर्वतशिखरावर असलेल्या हॉटेलमध्ये मोकळय़ा जागेत एक डबलबेड आहे. या बेडवर लाइटिंगची व्यवस्था आहे. तसेच मनोरंजनासाठी टीव्हीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये रुमसर्व्हिस असून त्याद्वारे बेडची सफाई, भोजन-पाण्याची व्यवस्था केली जाते.
बुकिंगसाठी मोठी प्रतीक्षायादी
या अजब हॉटेलमध्ये एक रात्र वास्तव्यासाठी 15 हजार रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो. यात वास्तव्य, भोजन अन् सुरक्षा व्यवस्था सामील आहे. या हॉटेलची लोकप्रियता मोठी असल्याने तेथे वास्तव्य करण्यासाठी लोक आगाऊ रक्कम देऊन बुकिंग करत असतात. या ओपन हॉटेलमध्ये बाथरुम नाही. याकरता पर्यटनांसाठी बेडवरून उठून सुमारे 5 मिनिटे पायी चालावे लागते. तेथे आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या जागेतील या हॉटेलमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. परंतु ते बेडपासून काही अंतरावर उपलब्ध असतात. या ओपन हॉटेलमध्ये बेडवर पहडून पर्यटन रात्री पर्वतशिखरे अन् त्याखालून वाहणाऱया नदीचे दृश्य न्याहाळत असतात.









